Pune : अनंत चतुर्दशीनंतर सलग दोन दिवस पुण्यातील मार्केट यार्ड राहणार बंद

एमपीसी न्यूज – अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी श्री छत्रपती शिवाजी मार्केट (Pune) यार्डातील घाऊक फळभाजी बाजार, तसेच उपबाजराचे कामकाज बंद राहणार आहे. शनिवारी (दि.30) मार्केट यार्डातील बाजार आवारास साप्ताहिक सुट्टी राहणार आहे.

Alandi : भागवत एकादशीनिमित्त माऊलीं मंदिरात आकर्षक फुलसजावट

अनंत चतुर्दशीनंतर सलग दोन दिवस मार्केट यार्डाचे कामकाज बंद राहणार आहे. शुक्रवारी (दि.29) मार्केट यार्डातील भाजीपाला, फळ, कांदा-बटाटा विभाग, फूल बाजार बंद राहणार आहे. खडकी, मोशी, मांजरी येथील उपबाजारांचे कामकाज बंद राहणार आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस आणू नये. असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, सचिव राजाराम धोंडकर यांनी केले आहे. मार्केट यार्डाच्या आवारातील बाजार समितीचा पेट्रोल पंप दोन दिवस बंद राहणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.