Bhosari: भांडण करण्यास रोखल्याने भांडणाऱ्या दोघांनी झोडपले

The two quarreled and beat other who came for solve the quarrel in bhosari

एमपीसी न्यूज- दोघेजण भांडण करत असल्याने एका तरुणाने भांडणाऱ्या दोघांना का भांडता असा जाब विचारला. यावरून एकमेकांशी भांडणाऱ्यांनी आपले भांडण सोडून सोडविण्यासाठी आलेल्या तरुणालाच मारहाण केली. ही घटना रविवारी (दिऊ. 31) रात्री साडेनऊ वाजता बालाजीनगर झोपडपट्टी येथे घडली.

निलेश सुनील पवार (वय 24, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी. मूळ रा. आदर्शनगर, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चिंग्या जाधव (वय 20), दाद्या जाधव (वय 22, दोघे रा. बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी फिर्यादी निलेश यांच्या घरासमोर एकमेकांना शिवीगाळ करत होते. यामुळे निलेश यांनी आरोपींना ‘तुम्ही एकमेकांशी का भांडण करत आहेत’ अशी विचारणा केली.

याचा राग मनात धरून एकमेकांशी भांडणाऱ्या आरोपींनी आपसात संगनमत करून निलेश यांना मारहाण केली. त्यात आरोपी चिंग्या याने चाकूने निलेश यांच्या डाव्या पायाच्या नडगीवर मारले.

तर आरोपी दाद्या याने हाताने मारहाण करून शिवीगाळ करत निलेश यांना जीवे मारण्याची धमकी दिली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.