Sangvi News : आर्थिक वादातून दोघांना चपलेने मारहाण; एकाला अटक

एमपीसी न्यूज – पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून एकाने दोघांना चपलेने मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 24) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिर ते पी के चौक दरम्यानच्या रस्त्यावर घडली. याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी मारहाण करणा-या व्यक्तीला अटक केली आहे.

गणेश सुखलाल साळुंखे (वय 45, रा. एरंडवणे, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत संजय विष्णू किर्दत (वय 41, रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिर ते पी के चौकाकडे जाणा-या रस्त्यावरून एका महिलेसोबत जात होते. त्यावेळी आरोपी तिथे आला. फिर्यादी संजय आणि आरोपी गणेश यांच्यात पूर्वीचा पैशांच्या देवाण घेवाणीवरून वाद सुरु होता. त्या वादातून गणेश याने संजय आणि त्यांच्या सोबत असलेल्या महिलेला चपलेने मारले. तसेच लाकडी काठीने मारून संजय यांना जखमी केले. त्यानंतर आरोपीने संजय यांना शिवीगाळ करून धमकी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.