Pune Accident News : भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : दौंड येथील मनमाड सांगली महामार्गावर आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दुचाकीला झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या तरुणाची भरधाव वेगातील दुचाकी रस्त्यामध्ये ठेवलेल्या बॅरिकेडला धडकली. ही धडक इतकी जोरात होती की यामध्ये दुचाकीस्वार तरुणाला गंभीर इजा झाली. तर दुचाकीवरील अन्य एक तरुण जखमी झाला आहे. 

अक्षय पांढरे (वय 25) असे मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मनमाड सांगली महामार्गावरील बारामती कडे जाणाऱ्या लेनच्या मध्यभागी असलेले चेंबर तुंबल्यामुळे फुटले होते. त्यामुळे या ठिकाणी अपघात होऊ नये यासाठी हे बॅरिकेड लावण्यात आले होते. परंतु आज पहाटेच्या सुमारास भरधाव वेगाने दुचाकीवरून जाणाऱ्या अक्षय पांढरे याला हे बॅरिकेट दिसले नाही आणि त्याची भरधाव वेगात दुचाकी त्याला जाऊन धडकली.

हा अपघात इतका भयानक होता की अपघातानंतर दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आणि त्याच्या पाठीमागे असलेला आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच दौंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी व्यक्तीला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. तर मयत व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.