Pune News : पाेलीसांकडे तक्रार दिल्याचे कारणाने दुचाकी जाळली

एमपीसी न्यूज : पाेलीसांकडे तक्रार केल्याचे कारणावरुन पाषाण परिसरातील लमाणतांडा वसाहत येथे राहणाऱ्या रुपेश हेंद्रे (वय-20) यांची दुचाकी ओळखीच्या एका तरुणाचे दुचाकीस आग लावुन तीचे नुकसान केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पाेलीसांनी यल्लाप्पा मंजुळकर (वय-31,रा/पाषाण,पुणे) या आराेपीस अटक केली आहे. 

_MPC_DIR_MPU_II

हेंद्र यांचे बहिणीची संबंधित आराेपी मंजुळकर याच्यासाेबत किरकाेळ कारणावरुन भांडणे झाल्यानंतर त्याबाबत तक्रार पाेलीसांना दिली हाेती.

या गाेष्टीचा राग येऊन मंजुळकर याने 28 डिसेंबर राेजी मध्यरात्री दीड ते दाेन वाजण्याचे सुमारास हेंद्रे यांचे घराबाहेर असलेल्या दुचाकीस आग लावून तीचे नुकसान केले आहे. सहाय्यक पाेलीस निरीक्षक संताेष काेळी याबाबत पुढील तपास करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.