Pune News : अल्पवयीन मुलगी प्रेग्नंट राहिल्यानंतर उघडकीस आला बलात्काराचा प्रकार

एमपीसी न्यूज : पुण्यातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवण्यात आले. यातून ही मुलगी प्रेग्नट राहिली आणि घरच्यांच्या लक्षात हा प्रकार आला. संबंधित तरुणावर विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी ही लोहगाव येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. महाविद्यालयात जात येत असताना आरोपीने तिच्या अल्पवयाचा व अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन ओळख व मैत्री केली.

_MPC_DIR_MPU_II

त्यानंतर तिला घर दाखविण्याच्या बहाण्याने लोहगाव येथील खंडोबा माळ डोंगरावर नेले. त्या ठिकाणी लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर आठ दिवसांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारे तिला त्याच ठिकाणी घेऊन जात तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले.

दरम्यान या सर्व प्रकारातून पीडित मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर तिने विमानतळ पोलिस स्टेशन गाठून संबंधित तरुणा विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.