Daund News : दोन दिवस घरातील खुर्चीवरच मृतदेह पडून, दौंडमधील दुर्दैवी घटना

एमपीसी न्यूज : दौंड शहरातून एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. शहरातील सतीश आनंदराज आंबूडकर (वय 78) या ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह दोन दिवस घरातील खुर्चीवरच पडून असल्याचे आढळून आले आहे. दोन दिवस झाले तरी दरवाजा न उघडल्यामुळे शेजाऱ्यांनी त्यांच्या दुसरा गावात राहणाऱ्या नातेवाईकांशी संपर्क साधल्याने हा प्रकार उघडकीस आला. 

_MPC_DIR_MPU_II

सतीश आंबूडकर सोनार होते. दौंडमध्ये त्यांचे दुकान होते. परंतु वार्धक्यामुळे त्यांनी दुकान काही वर्षांपूर्वी बंद केले होते. आजारपणामुळे मागील चार महिन्यांपासून त्यांची पत्नी मोहोळ येथे राहत होत्या. त्यामुळे दौंड येथील घरात सतीश एकटेच राहत होते.

दरम्यान मागील दोन दिवसांपासून सतीश आंबूडकर यांच्या घराचा दरवाजा आतून बंद होता आता. या दोन दिवसात शेजार आणि त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु आपण काहीच उत्तर येत नसल्यामुळे शेजाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. त्यात पाच एप्रिल रोजी त्यांच्या पत्नी नातेवाईकांसह घरी आल्या. त्यानंतर त्यांनी घरात प्रवेश केला असता सतीश आंबुडकर हे घरातील खुर्चीवर मृतावस्थेत आढळून आले.

पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला. दौड पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.