Pimpri : नियोजित असंघटित कष्टकरी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या नियोजित महाराष्ट्र असंघटीत कष्टकरी साहित्य संमेलनासाठी तयार करण्यात आलेले बोधचिन्हाचे अनावरण कष्टकरी कामगारांचे हस्ते आज करण्यात आले.

कष्टकरी साहित्य संमेलानाची तयारी करण्यात येत असून शहरात विविध ठिकांणचे कामगारांना माहिती देण्यात येत आहे. आज जेष्ठ कामगार जरिता वाठोरे यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी सुनंदा चिखले, मनीषा राऊत, अनिता राठोड, माधुरी जलमूलवार, बालाजी इंगळे, मधुकर वाघ, राजू बिराजदार, साइनाथ खंडीझोड़, इरफ़ान चौधरी, यासीन शेख, सुरेश देड़े, उमेश डोर्ले, तुकाराम माने, रजाक शेख, सुनील कांबळे, ओमप्रकाश मोरया, सखाराम केदार, इरफ़ान मुल्ला आदी उपस्थित होते, असंघटित कामगारांनी आपल्या कविता, लेख आपल्या शब्दात लिहून सादर कराव्यात, असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष काशिनाथ नखाते यानी यावेळी केले.