Pune : आगामी 2019 च्या निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच : नितीन गडकरी

एमपीसी न्यूज – आगामी 2019 च्या निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच होणार असून या निवडणुकीत आम्ही बहुमताने निवडून येऊ. तसेच आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही. अशी भूमिका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.

पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले हे पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, जी गोष्ट मी कधीच बोललो नाही. ते माझ्या नावाने खपवणे चुकीचे आहे. तसेच काल पुणे जिल्हा नागरी सहकारी बँकेच्या कार्यक्रमात आपण बोललेल्या वक्तव्याचा विपर्यास लावला जात असल्याने आपण ही पत्रकार परिषद घेतली आहे. यापूर्वी देखील किमान तीन वेळा माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. तोडून मोडून वाक्य छापण्यात आले आहे. ही दुर्दैवी बाब असून असच वारंवार होत राहील्यास बोलण कठिण होईल. अशी भूमिका त्यांनी मांडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.