Pune News : शहरातील या 10 बड्या रुग्णालयातील शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना बंद

एमपीसी न्यूज : शहरातील दहा बड्या रुग्णालयात सुरू असलेली ‘शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना’ बंद करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. त्यामुळे येथून पुढे अनेक शहरी गरीब कार्डधारकांना या योजनेंतर्गत संबंधित रुग्णालयांत उपचार घेता येणार नाही.

महापालिकेकडून शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेचा आढावा घेण्यात आला आहे. त्यामध्ये शहरातील काही रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि पंतप्रधान जन आरोग्य योजना (आयुष्यमान भारत) या दोन्ही योजना लागू आहेत. त्यातच शहरातील अनेक शहरी गरीब कार्डधारक या दोन योजनांसोबतचं महापालिकेच्या ‘शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजने’चा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे एकच व्यक्ती तीन प्रकारच्या योजनेचा लाभ घेत आहेत.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील एम्स रुग्णालय- औंध, गॅलॅक्सी रुग्णालय-कर्वे रस्ता, सह्याद्री सूर्या रुग्णालय- कसबा पेठ, भारती रुग्णालय -कात्रज, ग्लोबल रुग्णालय-दत्तवाडी, पवार मल्टिस्पेशालिटी रुग्णालय-खराडी, देवयानी रुग्णालय-कोथरूड, ससून रुग्णालय-पुणे स्टेशन, श्री रुग्णालय-शास्त्रीनगर, राव रुग्णालय-बिबवेवाडी या 10 रुग्णालयातील ‘शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निधी अन्य गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.