Pune : इंधनबचतीसाठी ‘सीएनजी’चा वापर वाढवायला हवा – शेखर इनामदार

विज्ञान परिषद-एमकेसीएल यांच्यातर्फे व्याख्यान

एमपीसी न्यूज – “कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) वर चालणाऱ्या गाड्याचा वापर नागरिकांकडून केला जावा, हा एक चांगला पर्याय आहे. अशा प्रकारातील गाड्यांच्या वापरामुळे इंधनबचत तर होतेच, तसेच प्रदूषणालाही आळा बसतो. शहरात २००६ पासून या प्रकारातील चारचाकी गाड्यांचा वापर सुरु झाला. इलेट्रीक गाड्याच्या (ई व्हेईकल) माध्यमातून होणाऱ्या प्रदूषणापेक्षाही सीएनजी गाड्या खूप कमी प्रदूषण करतात. त्यामुळे पुणेकरांनी ‘सीएनजी’वर चालणाऱ्या गाड्यांचा अधिकाधिक वापर करावा,” असे मत अभियंते शेखर इनामदार यांनी व्यक्त केले आहे.

मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अभियंते शेखर इनामदार यांचे ‘इंधन बदलामुळे प्रदूषण नियंत्रण’ या विषयावर व्याख्यान झाले, यावेळी ते बोलत होते. मयूर कॉलनी परिसरातील भारतीय शिक्षण संस्था येथे झालेल्या या व्याख्यानाला मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ, कार्यकारिणी सभासद वसंत
शिंदे, दीपाली अकोलकर, विनय र र, कार्यवाह संजय मा.क उपस्थित होते.

शेखर इनामदार म्हणाले, “पुण्यात सीएनजी गॅस पंपची संख्या ५० असून, आणखी २० नवीन पंप सुरु होणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या विषयावर अभ्यास आणि संशोधन करीत असून, इराणच्या कंपनीने बनवलेले सीएनजी किट येथील
गाड्यांमध्ये वापरुन प्रयोग केला आहे. परंतू ते भारतीय हवामानालामध्ये चालू शकले नाही. त्यानंतर भारतीय हवामानाला अनुकूल होईल असे काही बदल केले. यामध्ये प्रामुख्याने कार्बोरेटरमध्ये बदल केले. यानंतर ती गाडी पुण्यातील रस्त्यावर व्यवस्थित धावू शकेल, अशी बनविली. आतापर्यंत ६० गाड्यांना हे किट बसविले आहे. या किटची क्षमता जास्तीजास्त कशी वाढेल यावर अजून संशोधन सुरु आहे.”

राजेंद्रकुमार सराफ म्हणाले, ”दुचाकी तसेच चारचाकी वाहन चालविणाऱ्यांना इंधन म्हणून सीएनजी गॅस वापर हा फायदेशीर ठरेल. यामुळे इंधन वापरावरील खर्च तसेच प्रदूषण कमी होईल. पर्यावरण प्रेमींनी तसेच विज्ञान अभ्यासकांनी या विषयाबद्दल लोकांमध्ये जागृकता वाढवावी.” दीपाली अकोलकर यांनी सूत्रसंचलन केले. विनय र र यांनी प्रस्तावना केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.