Talegaon Dabhade news : नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास व्यवसायात निश्चित प्रगती साधता येते

एमपीसी न्यूज : व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादन घेतल्यास निश्चितच प्रगती साधता येते. असे मत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव यशस्वी उद्योजक नंदकुमार शेलार यांनी व्यक्त केले.

रुडसेट संस्था व मावळ ॲग्रो यांच्यावतीने रुडसेटी यशस्वी पोल्ट्री व्यवसायकांची एक दिवशीय कार्यशाळाच्या उद्घाटना निमित्त शेलार बोलत होते. या कार्यक्रमास मावळा ॲग्रोचे संस्थापक व पीडीसी बँकेचे माजी अध्यक्ष माऊली दाभाडे, साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखळकर, पीडीसी बँकेचे अधिकारी शितोळेसर, रूडसेटचे माजी संचालक मारुतराव सावंत, ज्येष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे, पशुसंवर्धन अधिकारी दिनेश सोलकर,रूडसेटचे संचालक  जयंत घोंगडे व रूडसेट सहाय्यक दिनेश निळकंठ उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना सुरेश साखळकर यांनी सांगितले कि, संस्था करत असलेले काम आणि मावळ ॲग्रोच्या माध्यमातून दिलेले प्रशिक्षण हे निश्चितच मावळाचा विकास घडवण्यासाठी उपयोगी पडणार आहे.

संस्थेचे संचालक जयंत घोंगडे म्हणले,  संस्था करत असलेले काम नागरिकांना यशस्वी होण्यासाठी मार्ग दाखवणारे आहे.

कार्यक्रमाचा समारोप करताना माऊली दाभाडे यांनी पोल्ट्री व्यवसाय हा सर्वात जास्त यशस्वी उद्योग आहे. आजच्या या कोरोना काळात प्रोटीनसाठी सर्वात मोठा पर्याय म्हणून जगासमोर आला आहे.  याचाच फायदा घेऊन एकाचे दोन पोल्ट्री शेड उभे करून यशस्वी व्हा!

या एक दिवशीय कार्यशाळेमध्ये बँकिंग तज्ञ, मार्केटिंग तज्ञ, विविध कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. यांनी उपस्थि उद्योजकांच्या समस्या व अडीअडचणी समजून यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले.

रूडसेट करत असलेले विनामूल्य व्यवसाय प्रशिक्षणाचे काम फक्त प्रशिक्षण देऊन न थांबता ज्या प्रशिक्षणार्थींनी व्यवसाय चालू केला आहे. त्यांना व्यवसाय वाढीसाठी अशा प्रकारच्या कार्यशाळेचे आयोजन करून एक यशस्वी उद्योजक ही ज्याने आपल्या बरोबर इतर लोकांनाही व्यवसायामधून रोजगार निर्मिती करावी आणि उद्देश सफल करत आहे.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन संदीप पाटील, हरीश बावचे, योगिता गरुड, रवी घोजगे व  बाळू उघडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनबा गोपाळे गुरुजी यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दिनेश नीळकंठ यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.