Wakad : वाकड येथील ‘वेदांता सोसायटी’ने चक्क सोसायटीतच उभारला विलगीकरण कक्ष

The Vedanta Society at Wakad sets up an isoltion room in the society itself.

एमपीसी न्यूज – देशात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती रुग्ण संख्या आणि रुग्णालयामध्ये उपलब्ध बेड यांची संख्या  देखील एक चिंतेचा विषय बनला आहे. ही अडचण लक्षात घेऊन वाकडमधील वेदांता सोसायटीने ऑक्सिजन, डॉक्टरसह प्राथमिक सुविधांनी सुसज्ज असा विलगीकरण कक्ष सोसायटीतच उभारून एक आदर्श निर्माण केला आहे.

वेदांता सोसायटीतील सहा नागरिकांना कोरोनाची बाधा झाली. या रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध होताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे सोसायटीच्या आवारातच असलेल्या एका खोलीत विलगीकरण कक्ष उभारण्याचा निर्णय सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला.

वाकडमधील वेदांता सोसायटीमध्ये 344 सदनिका असून, त्यात सुमारे दोन हजार नागरिक राहतात.

सध्या विलगीकरण कक्षात बेड, गॅस शेगडी, पल्स ऑक्सिमीटर, थर्मल गन, ऑक्सिजनची सिलिंडर आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

तसेच वेदांता सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सोमनाथ धोंडे तसेच इतर पदाधिकारीही अलगीकरण कक्षात असलेल्या येथील रहिवाशांकडे लक्ष देऊन असतात. सोसायटीतील काही सदस्यांनी स्वतः पुढे येऊन विलगीकरण कक्षात असलेल्या रहिवाशांना जेवणाचा डबा पुरविण्याची तयारी दर्शविली आहे.

शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णालयातील उपलब्ध बेड की संख्या कमी होत आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी वेदांता सोसायटी ने केलेला उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.