BNR-HDR-TOP-Mobile

Pune – वाहनचोरी करणा-या दोघांना अटक; तब्बल 10 वाहने केली हस्तगत

105
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वाहनांची चोरी करणा-या दोघांना पोलिसांनी काल (दि.13) रात्री हडपसर येथून अटक करून त्यांच्याकडून आतापर्यंत एकूण 9 दुचाकी व 1 चारचाकी जप्त केल्या आहेत. अविनाश अशोक यादव(वय 21, रा. नेवासा, अहमदनगर) ज्ञानेश्वर माधव देवकर (वय 19, रा. नेवासा, अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस स्टेशन येथील वाहन चोरीच्या अनुषंगाने हडपसर येथे पोलीस गस्त घालत असताना कवटीपाट टोलनाका येथे दोन संशयित इसम मोटरसायकलवर फिरताना दिसले पोलिसांनी त्यांच्याकडे तपासणी केली असता त्यांच्याजवळ गाडीची कोणतीही कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले व त्यांची चौकशी केली त्यांनी ती मोटारसायकल चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांच्या कडे कसून चौकशी करून तपासणी केली असता त्या दोघांनी यापूर्वी हडपसर मधून 2 दुचाकी 1 चारचाकी, सांगावी येथून 1 दुचाकी तसेच शहरातील वेगवेगळ्या भागातून 4 ते 5 दुचाकी वाहने चोरल्याचे उघडकीस आले. दोघे आरोपी हे नेवासा फाटा येथून पुणे, ठाणे, अहमदनगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वाहनांची चोरी करत होते. त्यांच्या विरुद्ध औरंगाबाद येथे चोरीचे चार गुन्हे देखील दाखल आहेत

या आरोपींकडून हडपसर पोलिसांनी आतापर्यंत एकूण 9 दुचाकी व 1 चारचाकी जप्त केली आहे व पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.