Sangvi : सख्ख्या चुलत्यानेच केला ‘त्या’ चिमुरडीवर अत्याचार; नराधम चुलता गजाआड

एमपीसी न्यूज – सांगवी येथे एका अडीच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. हा बलात्कार तिच्या सख्ख्या चुलत्यानेच केला असल्याचे समोर आले आहे. सांगवी पोलिसांनी नराधम चुलत्याला अटक केली आहे.

सांगवी परिसरात पीडित बांधकाम कामगार कुटुंब राहते. पत्र्याचा आडोसा केलेल्या खोलीवजा घरात हे कुटुंब राहत आहे. नवरा-बायको आणि अडीच वर्षाची चिमुकली असे हे कुटुंब होते. मंगळवारी (दि. 23) पहाटे अज्ञात आरोपीने अर्धवट उघड्या असलेल्या या घरात प्रवेश केला. अडीच वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण केले. आरोपींनी तिच्याशी अमानुषपणे अत्याचार केले. तसेच तिचा गळा आवळून ठार मारले. ठार मारलेल्या चिमुकलीचा मृतदेह आरोपीने सांगवी येथील मिलिटरीच्या परिसरात पाण्याने भरलेल्या नाल्यात टाकून दिला.

मंगळवारी मध्यरात्री तिच्या आईला मुलगी घरात नसल्याचे जाणवले. त्यांनी चिमुरडीच्या वडिलांना आणि आजूबाजूच्या लोकांना याबाबत सांगितले. सर्वांनी चिमुरडीचा बराच वेळ शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. त्यामुळे पालकांनी तात्काळ सांगवी पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांच्या पथकाने मुलीचा शोध सुरु केला असता सांगवी येथील मिलिटरीच्या परिसरात मुलीच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या एका नाल्यामध्ये तिचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदन अहवालात तिच्यावर अमानुषपणे लैंगिक अत्याचार करून गळा आवळून ठार मारल्याचे समोर आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.