Pune : तरुणीची छेड काढून मारहाण

एमपीसी न्यूज – शतपावली करण्यसाठी गेलेल्या तरुणीची छेड काढून मारहाण केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि 28) रात्री साडेनऊच्या सुमारास स्वारगेट येथील मुकुंदनगर येथील रस्त्यावर घडली.

याप्रकरणी एका 20 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व तिची मैत्रीण या नेहमीप्रमाणे रात्री जेवण करून गल्लीतील रोडवर शतपावली करत होत्या. त्यावेळी दुचाकीवर ट्रिपलसीट तीन अज्ञात इसम आले व फिर्यादीच्या मैत्रिणीची छेड काढत तिच्या शरीराला स्पर्श केला. त्यामुळे तरुणीने चिडून अज्ञात इसमांना शिव्या दिल्या.

शिव्या दिल्यामुळे त्या मुलांना राग आला आणि गाडीवरून उतरत एका मुलाने त्या तरुणीच्या गालात चापट मारत तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यातील आरोपींचा शोध सीसीटीव्ही फूटेज तपासून घेण्यात येत आहे.

याप्रकरणी पुढील तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.