Vadgaon Maval : बुलंदमावळचा बुलंद विजय 

उपविजेते अकरा हनुमान क्लब 

एमपीसी न्यूज : वडगांव मावळ येथील ज्येष्ठ खेळाडूंच्या क्रिकेट संघाचे गेटटुगेदर स्पर्धा घेण्यात आली. हे यंदाचे  तिसरे वर्ष आहे. वडगांव शहरातील ज्येष्ठ खेळाडूंसाठी हया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एकत्र येऊन खेळाचा व गेटटुगेदरचा आनंद घेऊन मानाचा करंडक जिंकण्यासाठी सर्व संघ मैदानात खेळण्यासाठी आले.  या गेटटुगेदर स्पर्धेत एकूण 97 खेळाडूंचा सहभाग होता. यांचे आयोजन ओल्ड ईज गोल्ड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात आले असून या स्पर्धेत एकूण जुन्या काळातील ६ संघानी आपला सहभाग घेतला. 

तसेच या गेटटुगेदर स्पर्धेचे उदघाटन ज्येष्ठ अष्टपैलू खेळाडू सावळा ओव्हाळ यांच्या हस्ते करण्यात आले तसेच नगरसेवक  राहुल ढोरे, अध्यक्ष आनंद बाफणा, उपाध्यक्ष विनय सुर्वे, खजिनदार रजनिश ढोरे,सचिव अनिल कोद्रे, माजी अध्यक्ष सचिन आफळे,अशोक ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

अजिंक्य, बुलंदमावळ, 11 हनुमान, विजयनगर, फ्रेंड्स व यंगस्टार,या संघामध्ये स्पर्धा खेळवण्यात आली असता अंतिम फेरीत बुलंदमावळ व 11 हनुमान या संघामध्ये अंतिम सामना (फायनल) झाला. या अंतिम सामन्यात बुलंदमावळने नाणेफेक जिंकून 11 हनुमान या संघाला फलंदाजीसाठी पाचरण केले.  कर्णधार आनंद बाफना यांनी 20 धावा केल्या तर  सचिन, मनोज, नितीन यांनी बाफना यांना चांगली साथ दिली.  बुलंदमावळचे गोलंदाज पुरंदर, गिरीष, प्रशांत यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. 11 हनुमान संघाला 6 षटकात 41 धावा करता आल्या व या धावांचे आव्हान घेऊन बुलंदमावळचे फलंदाज नितीन यांनी 26, शैलेश व अभय यांनी प्रत्येकी 9 धावा करत संघाला सुरेख साथ देत अंतिम सामन्यात 5 षटकात 42 धावा करत बुलंदमावळ या संघाला विजयी केले. ओल्ड ईज गोल्ड फिरत्या करंडकावर आपले सुवर्ण अक्षरात नाव कोरले.

तसेच या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज फलंदाज नितीन शिंदे, उत्कृष्ट गोलंदाज नितीन चव्हाण, उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू मनोज जाधव यांना हा किताब देऊन गौरविण्यात आले. बक्षिस समारंभ आयोजक कमिटी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला

संक्षिप्त धावफलक : 11 हनुमान क्लब : 6 षटकात 6 बाद 41 ( आनंद बाफणा 20, नितिन ढमाले 9 ,सचिन जाधव 6,मनोज जाधव 6,पुरधंर शेट्टी 1/6, गिरीश झांबरे 1/12, प्रशांत वाघमारे 1/12. ) पराभूत,   बुलंदमावळ क्लब : 5 षटकात 2 बाद 42 ( नितिन शिंदे 26, शैलेश वहिले 9, अभय बवरे 9.)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.