Pune : मुंबई चे राजे संघाचा विजय

इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धा

एमपसी न्यूज – काही धक्कादायक निकाल आणि काही चुरशीच्या सामन्यानंतर मुंबई चे राजे संघ पुन्हा विजयी मार्गावर आला आहे. मुंबई चे राजे संघाने  इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेत चेन्नई चॅलेंजर्सचा ब गटातील सामन्यात 32-28 असा पराभव केला. या विजयानंतर मुंबई चे राजे संघ सहा सामन्यानंतर सहा गुणांसह दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

मुंबई चे राजे संघाने आपल्या ताफ्यात दोन नवीन चढाईपटूचा समावेश करत आपले इरादे स्पष्ट केले. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघात चांगली चुरस पहायला मिळाली. एक-एक गुण मिळवण्यासाठी खेळाडू झुंजताना दिसले. त्यामुळे पहिल्या क्वॉर्टर अखेरीस सामना 7-7 असा बरोबरीत होता.

_MPC_DIR_MPU_II

दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये चेन्नई चॅलेंजर्स संघाने मुंबई चे राजे संघाविरुद्ध आक्रमक खेळ केला व आघाडी 14-9 अशी केली. महेश एम आणि मनवीरा कांथा यांनी सलग गुणांची कमाई केली. तरीही चेन्नई संघाने दुसऱ्या क्वॉर्टर अखेरीस 15-12 अशी आघाडी घेतली.चेन्नईच्या बचावफळीने चांगली कामगिरी करत संघाला तिसऱ्या क्वॉर्टर अखेरीस 22-19 अशी आघाडी घेतली.

चेन्नईच्या संघाने शेवटच्या क्वॉर्टरमध्ये दोन सलग सुपर टॅकल करत 26-20 अशी आघाडी मिळवली. यानंतर मुंबई चे राजे संघाच्या बचावाने चेन्नई संघाला सर्वबाद करत सामना 26-26 असा बरोबरीत आणला.यानंतर मुंबई चे राजे संघाचे चढाईपटू मनवीरा आणि महेश यांनी सहा सलग गुणांची कमाई करत संघाची गुणसंख्या 32 पर्यंत पोहोचवली.यानंतर चेन्नई चॅलेंजर्स संघाला पुनरागमन करणे जमले नाही व त्यांना 28-32 असे पराभूत व्हावे लागले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.