Pune News : सराईत गुंडांचा हातात कोयता घेऊन नाचत असल्याचा व्हिडीओ व्हायरल  

सिंहगड रस्ता परिसरात दहशत,

0

एमपीसी न्यूज : तडीपार असतानाही एका सराईत गुंडाने शहरात येऊन हातात कोयता घेऊन नाचत दहशत पसरवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रोशन लोखंडे असे या तडीपार गुंडाचे नाव आहे. पुण्याच्या सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नऱ्हे येथील ही घटना आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

_MPC_DIR_MPU_II

रोशन लोखंडे याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांनी त्याला शहर आणि जिल्ह्यातून तडीपार केले आहे. दोन दिवसांपासून सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हातात कोयता घेऊन एका तरुणाच्या खांद्यावर बसून तो नाचताना दिसत आहे. तर याच ग्रुपमध्ये नाचणाऱ्या अन्य एका तरुणाच्या हातात बंदूकही दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ कुणीतरी सोशल मीडियावर टाकल्याने हा प्रकार उघडकीस आला.

या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिंहगड रस्ता पोलिसांकडून मात्र अद्याप या प्रकरणी अद्याप कुठलीही कारवाई केली नाही. तडीपार असलेले गुंड शहरात येऊन अशाप्रकारे गुन्हेगारी कृत्य करीत असल्याचे माहित असूनही पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment