Maval : राष्ट्रवादीला मत म्हणजे तालुक्याला विकासापासून मागे खेचणे – संतोष दाभाडे पाटील

एमपीसी न्यूज – खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच बाळा भेगडे यांना मंत्रिपद दिले जाईल, असे जाहीरपणे सांगितल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून मंत्रिपद कशाला, असे म्हणत ते विकासाच्या वाटेवर असलेल्या आपल्या तालुक्यास मागे खेचण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे तळेगाव दाभाडे शहराचे अध्यक्ष संतोष हरीभाऊ दाभाडे पाटील यांनी केला आहे.

राज्यात भाजप-शिवसेना-आरपीआय मित्र पक्ष महायुतीची सत्ता येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. अशावेळी मावळात सुद्धा भाजप उमेदवार निवडून येणे तालुक्याचे विकासाचे दृष्टीने महत्वपूर्ण आहे. विरोधी आमदार सत्ता नसल्याने कोणतीही विकास कामे योग्यरितीने मार्गी लावू शकत नाही किंवा शासकीय निधी मतदारसंघात आणू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. पण, मावळ मधील निवडून येणारा भाजप उमेदवार थेट मंत्री होणार असल्याने तालुक्याचे विकासाला गती मिळणार आहे आणि राज्य शासनाचा आर्थिक निधी आणि विविध योजनांचा लाभ तालुक्यातील नागरिकांना उपलब्ध करून देणार आहे, असे संतोष दाभाडे यांनी म्हटले आहे.

मावळाला विकासापासून वंचित ठेवण्याचा कुटील डाव करणाऱ्या विरोधकांना, मावळ मधील मतदार धडा शिकवल्या शिवाय आता स्वस्थ बसणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसला मावळात स्वतःच्या पक्षात उमेदवार न मिळाल्याने दुसऱ्या पक्षतील उमेदवार आयत करण्याची वेळ आली असून तालुक्यातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसची अवस्था भरकटलेली दिसून येत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

मावळातील वातावरण झाले ‘भाजपमय’

मावळ तालुक्यातील प्रत्येक गावागावामध्ये राज्यमंत्री बाळा भेगडे यांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र भाजपच्या प्रचार रॅलीमध्ये दिसून येत आहे. तरुणांसोबत महिलांचा वाढता पाठिंबा भेगडे यांना असून ठिकठिकाणी जनताच विकास कामे सांगू लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळा भेगडे निवडून आल्यानंतर त्यांना थेट मंत्री करणार असल्याचे आश्वासन तळेगाव दाभाडे येथील सभेत दिल्याने संपूर्ण मावळातील गावागावांत भाजपमय वातावरण झाल्याचे पहावयास मिळत आहे.

राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यामार्फत अनेक गावांमध्ये रस्ते, घरे, पूल, स्मशान भूमी, पिण्याची पाणी योजना,कचरा व्यवस्थापन, व्यायामशाळा, स्वयं रोजगार, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये रोजगार निर्मिती अशी विकासकामे झाली आहेत. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा गोरगरीब नागरिकांना फायदा झाल्याने यावेळी तालुक्याला मंत्रिपदाची चिन्ह निश्चित असल्याचे वातावरण झालेले दिसत आहे. आतापर्यंत झालेल्या मावळातील वाड्या वस्त्या मधील प्रचारामध्ये स्त्रियांचा सहभागही लक्षणीय दिसून आलेला आहे. गावागावांमध्ये नागरिक आतुरतेने राज्यमंत्री बाळा भेगडे यांची वाट पाहत त्यांचे जल्लोषात स्वागत करत असल्याचे दिसून येत होते, असे संतोष दाभाडे यांनी म्हटले आहे.

आमदारकीसाठी इच्छुक असणारे भाजप नेते रवींद्र भेगडे प्रचारात दिवसरात्र सक्रीय झाल्याने तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात नुकताच प्रवेश केलेले बाळासाहेब नेवाळे प्रचारात हिरीरीने भाग घेत असल्याने बाळा भेगडे यांचे पारडे जड झाले आहे. त्यासोबत मावळ पंचायत समिती, देहूरोड-तळेगाव-वडगाव -कामशेत-लोणावळा या शहरांतील लोकप्रतिनिधी आणि मावळ तालुक्यातील विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा बाळा भेगडे यांना जाहीर पाठिंबा असल्याने भेगडे यांनी निवडणुकीत तगडे आव्हान उभे केले आहे.

ग्रामीण भागात भेगडे यांचे रॅलीस अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून अनेक गावांमध्ये संपूर्ण गावचे संपूर्ण मतदान हे भाजपलाच असल्याचा दावाही नागरिकांनी आत्मविश्वासाने केला आहे. त्यामुळे तालुक्याच्या मंत्रिपदाची चिन्हे जवळपास निश्चित झाली असल्याचे दिसत आहे.यावेळी आमदार नाहीतर आम्ही मंत्रीच निवडून देणार असा निर्धार गावागावातील तरुण व्यक्त करत आहे, असे दाभाडे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like