Pune News : धक्कादायक….हॉटेलमधील स्वच्छतागृहात वेटरनेच केले तरूणीचे चित्रीकरण

एमपीसी न्यूज : हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेलेल्या तरूणीचे स्वच्छतागृहात एका वेटरनेच मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरूणीच्या चाणाक्षपणामुळे तिने वेटरला विचारणा केली असता, तो धक्का देउन पळून गेला. ही घटना दोन दिवसांपुर्वी रात्री नउच्या सुमारास पाषाणमधील हॉटेल हॅपी द पंजाबमध्ये घडली.

याप्रकरणी हाफिज अन्सारी (वय १८)  याच्याविरूद्ध चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी १८ वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूणी दोन दिवसांपुर्वी रात्री साडेआठच्या सुमारास कुटूंबियासोबत सुतारवाडी बंगलोर मुंबई महामार्गालगत हॉटेल हॅपी द पंजाबमध्ये जेवणासाठी गेली होती. त्यानंतर काही वेळाने तरूणी स्वच्छतागृहात गेली असता, हाफिज मोबाईलमध्ये तरूणीचे चित्रीकरण करताना दिसून आला. त्यामुळे संबंधित तरूणीने त्याला जाब विचारला. घाबरलेल्या अवस्थेत हाफिज हॉटेलमधून बाहेर पळून गेला. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.