Break the Chain : अवघ्या दोन तासात उरकावा लागणार विवाह सोहळा

0

एमपीसी न्यूज – ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत गुरुवार (दि. 22 एप्रिल) रोजी रात्री 8 वाजेपासून होणारी सुधारित नियमावली लागू होणार आहे. ही नियमावली 1 मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने राज्य शासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यात विवाहाबाबत देखील नवीन नियम जाहीर करण्यात आले आहेत. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अवघ्या दोन तासात आता विवाह सोहळा उरकावा लागणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

विवाहसमारंभ साजरे करताना ते एकच समारंभ म्हणून एकाच हॉलमधे केले जावेत असे नवीन नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे. विवाह सोहळा जास्तीत जास्त दोन तासात पूर्ण करावा लागेल. हे कार्यक्रम करताना जास्तीत जास्त 25 व्यक्ती उपस्थित राहू शकतील, असेही नव्या नियमावलीमध्ये सांगण्यात आले आहे.

विवाहसंबंधी जाहीर केलेल्या नव्या नियमांचे पालन न करणाऱ्या तसेच या निर्बंधांचा भंग करत असलेल्या कुटुंबांना 50 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तसेच संबंधित हॉल किंवा समारंभस्थळ कोविड-19 ची आपत्ती आहे तोवर बंद केले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment