Renuka Shahane Reacts On Sushant Death: ‘सत्य तर संपूर्ण देशालाच जाणून घ्यायचे आहे’

The whole country wants to know the truth, Renuka Shahane Reacts On Sushant Death सर्वांत आधी स्टारकिड्स मारेकरी होते, त्यानंतर बॉलिवूडमधली गँग मारेकरी ठरली, नंतर मानसिक स्वास्थ्याचा प्रश्न उपस्थित राहिला, रिया व तिच्या कुटुंबीयांवर आरोप होत आहेत आणि आता आदित्य ठाकरेंवर आरोप केले जात आहेत.

एमपीसी न्यूज – अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी आता सीबीआयच्या चौकशीचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पण त्याआधी या प्रकरणावर प्रचंड गदारोळ सुरु आहे. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीदेखील यावर आपले मत व्यक्त केले आहे. एका नेटकऱ्याने केलेल्या ट्विटवर त्या व्यक्त झाल्या आहेत. ‘नेमकं काय घडलं हे संपूर्ण भारताला जाणून घ्यायचंय. सुशांतच्या चाहत्यांच्या भावनांना थांबवू नका. सत्य काय आहे ते सीबीआयने समोर आणू दे’, असं ट्विट एका नेटकऱ्याने केलं. त्या ट्विटला रेणुका शहाणेंनी उत्तर दिलं आहे.

‘तू बरोबर आहेस. संपूर्ण देशाला सत्य जाणून घ्यायचंय. सर्वांत आधी स्टारकिड्स मारेकरी होते, त्यानंतर बॉलिवूडमधली गँग मारेकरी ठरली, नंतर मानसिक स्वास्थ्याचा प्रश्न उपस्थित राहिला, रिया व तिच्या कुटुंबीयांवर आरोप होत आहेत आणि आता आदित्य ठाकरेंवर आरोप केले जात आहेत. अशाप्रकारे एकमेकांवर चिखलफेक करून सत्य समोर येणार आहे का? हा प्रश्न तुम्ही स्वत:ला विचारा’, असं ट्विट रेणुका शहाणेंनी केलंय.

सुशांतच्या आत्महत्येला आता जवळपास दीड महिना लोटला आहे. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सुशांतच्या आत्महत्येच्या जवळपास दीड महिन्यानंतर त्याच्या वडिलांनी पाटणा पोलिसांकडे अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली.

त्यांच्या तक्रारीवरून पाटणा पोलिसांनी रियाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुशांतच्या आत्महत्येचा तपास आता मुंबई पोलिसांसोबत बिहार पोलीससुद्धा करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.