Pune News : भिडे फुलावर जलपर्णी अडकल्यामुळे संपूर्ण रस्ता बंद

एमपीसी न्यूज : पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात गेल्या 24 तासात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे धराण पूर्ण क्षमतेने भरले असून गुरुवारी संध्याकाळ पासून पाण्याचा विसर्ग मुठा नदीत करण्यात आला. या विसर्गा बरोबर आलेली जलपर्णी डेक्कन येथील भिडे फुल येथे   अडकल्यामुळे संपूर्ण रस्ता ब्लॉक झाला आहे. 

पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी पानशेत, खडकवासला, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणात 14 टीएमसी पाणी होते. ते शुक्रवारी सकाळी 18 टीएमसी झाले. तर खडकवासला धरणात गेल्या 12 तासात .0.70 टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहे. परिणामी गेल्या 24 तासात 5 टीएमसीने पाणी साठा वाढला होता.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.