BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : महिलेने महिलेकडे मागितली पाच लाखांची खंडणी

एमपीसी न्यूज – जबरदस्तीने महिलेच्या घरात घुसून तिच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. याबाबत एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 8 जून रोजी दिघी रोड भोसरी येथे  घडली.

अर्चना जळमकर (रा. नुरी मोहल्ला कॉलनी, दिघी रोड, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी माधुरी गजानन धोटे (वय 30, रा. आळंदी रोड, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जून रोजी माधुरी त्यांच्या घरी एकट्याच होत्या. त्यावेळी आरोपी अर्चना हिने त्यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. घरात घुसून माधुरी यांना शिवीगाळ व दमदाटी करत हाताने मारहाण केली. तसेच माधुरी यांच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. याबाबत माधुरी यांनी भोसरी पोलिसात गुन्हा नोंदवला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.