-MPC-TOP-MOST-BANNER-I

Chinchwad News : महिलेला फेसबुकवरील मैत्री पडली महागात; 4 लाख 70 हजारांची फसवणूक

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – एका महिलेला फेसबुकवरील मैत्री चांगलीच महागात पडली आहे. अनोळखी व्यक्तींनी महिलेचा विश्वास संपादन करून तिची चार लाख 70 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. हा प्रकार सात एप्रिल ते 16 जून 2021 या कालावधीत चिंचवड येथे घडला.

डॉ. फिलीप लिओ, इंडियन बँक अकाउंट नंबर 6949544144 आणि इंडियन ओव्हरसीज बँक अकाउंट नंबर 129101000014410 आणि मोबाईल फोन क्रमांक 9140889015 धारकांच्या विरोधात याबाबत भारतीय दंड विधान कलम 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 47 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉ. फिलीप लिओ याने फिर्यादी यांच्याशी फेसबुकवर मैत्री केली. तसेच फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून चार लाख 70 हजार रुपये घेतले. घेतलेले पैसे परत न करता आरोपीने महिलेची फसवणूक केली. हे पैसे आरोपीने दोन बँक खात्यांवर घेतले आहेत. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn