Pimpri : बसमध्ये बसलेल्या महिलेच्या बॅगेतील दीड लाखाचे दागिने लांबविले

एमपीसी न्यूज – एसटी महामंडळाच्या बसमध्ये प्रवासासाठी बसलेल्या महिलेच्या हातातील बॅगेतील पर्समधील एक लाख 38 हजार रुपये किमतीचे सात तोळे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्याने लांबविले. ही घटना वल्लभनगर बसस्थानक येथे घडली.

याप्रकरणी सतेजा मच्छिंद्र मोरे (वय 36 रा. साईधाम कॉलनी, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्या फिर्याद दिली आहे.

फिर्यादी मोरे या 26 ऑक्टोबर रोजी गावी जाण्यासाठी वल्लभनगर बसस्थानकात आल्या होत्या. दुपारी बाराच्या सुमारास बसमध्ये बसल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील उघड्या बॅगेतून छोट्या पर्समधील एक लाख 38 हजार रुपये किमतीचे सात तोळे सोन्या-चांदीचे दागिने लांबविले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.