Nigdi : ‘माझ्या पती सोबत लग्न का केलंस’ असे विचारणाऱ्या महिलेला पेटवले

0

एमपीसी न्यूज –  पती सोबत लग्न का केले’ असे विचारण्यासाठी तसेच पेट्रोल अंगावर ओतून धमकावण्यासाठी गेलेल्या महिलेला दोन महिलांनी मिळून पेटवून दिले. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना गुरुवारी (दि. १९) दुपारी चार वाजता ओटास्कीम येथे घडली.

अलिशा शेख आणि तिची बहीण (नाव माहिती नाही, दोघी रा. ओटास्कीम, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपी महिलांची नावे आहेत. याबाबत गंभीररित्या भाजलेल्या ३३ वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अलिशा हिने फिर्यादी महिलेच्या पतीसोबत लग्न केले. त्यामुळे फिर्यादी महिला गुरुवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास ‘माझ्या पती सोबत लग्न का केले’ असे विचारण्यासाठी गेली. दरम्यान फिर्यादीने अलिशा हिला धमकाविण्यासाठी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून हातात माचीस घेऊन गेली.

अलिशा हिला जाब विचारत असताना अलिशा आणि तिच्या बहिणीने फिर्यादी सोबत झटापट केली. त्यात फिर्यादीच्या हातातील माचीस खाली पडली. आरोपींनी खाली पडलेली माचीस उचलून माचीस पेटवली. फिर्यादी महिलेने अंगावर पेट्रोल ओतून घेतले असल्याने पेटवलेल्या माचीसचा भडका उडून त्यात फिर्यादी महिला गंभीररीत्या जळाली आहे. याबाबत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III