Pimpri News : मुलाच्या वाढदिवसासाठी केक आणायला गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – मुलाच्या वाढदिवसासाठी केक आणायला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 9) रात्री संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली.

सुषमा महिंद्र मोरे (वय 36, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोरे या त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त केक खरेदी करण्यासाठी मैत्री चौकातून वल्लभनगरच्या दिशेने जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून दोन अनोळखी चोरटे आले. चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.