Dighi : महिलेचे गंठण हिसकावले

एमपीसी न्यूज – पायी जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील 60 हजार रूपये किमतीचे गंठण दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने हिसकावले. ही घटना शुक्रवारी (दि. 8) दिघी रोड येथील एका स्विटमार्ट समोर सायंकाळी सहा वाजता घडली.

याप्रकरणी दीपक परशुराम माळी (वय-21, रा. केशवनगर, मुंढवा, पुणे), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार प्रविण कछवा हा पसार झाला आहे. याप्रकरणी संगीता शेखर म्हस्करे (वय-50, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची नणंद भारती म्हस्करे या शुक्रवारी सायंकाळी दिघीतील एका स्विट मार्ट समोरून पायी जात होत्या. त्यावेळी नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपीपैकी एकाने भारती यांच्या गळ्याला जखम केली. त्यांच्या गळ्यातील 60 हजार रूपयांचे पावणे दोन तोळे वजनाचे गंठण हिसकावून पळ काढला. मात्र, पोलिसांनी आरोपी दीपक माळीला अटक केली. भोसरी ठाण्याचे फौजदार एम. बी. गाढवे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.