Pimpri: पोलीस आयुक्तलायाच्या इमारतीचे काम महिनाअखेरपर्यंत पुर्ण होणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. रंगरंगोटीची कामे सुरु असून नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत इमारतीचे काम पुर्ण होईल. त्यानंतर डिसेंबरच्या  पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नव्या इमारतीचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे. 

याबाबतची माहिती सभागृह नेते एकनाथ पवार यांनी दिली. पिंपरी-चिंचवडमधील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी शहरासाठी 15 ऑगस्टपासून स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु झाले आहे. तात्पुरत्या स्वरुपात चिंचवड येथील अॅटो क्लस्टर मधून आयुक्तालयाचे कामकाज सुरु आहे. पोलीस आयुक्तालय चिंचवड, प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले शाळेच्या इमारतीमध्ये कायमस्वरुपी होणार आहे. इमारतीमध्ये स्थापत्य, फर्निचरची कामे सुरु आहेत. या इमारतीत नवीन बांधकाम,रंगरंगोटी,रस्ते,फर्निचर अशा विविध प्रकारची काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली.

पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीच्या कामाला वेग देण्यात यावा. कामाचा दर्जा चांगला ठेवण्यात यावा. 25 नोव्हेंबरपर्यंत उर्वरित सर्व कामे पूर्ण करावीत, अशा सूचना सभागृह नेते एकनाथ पवार यांनी अधिका-यांना दिल्या. इमारतीचे काम पुर्ण झाल्यानंतर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेऊन त्यांच्या हस्ते नव्या इमारतीत प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन केले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.