International News : जागतिक आरोग्य संघटनेने जम्मू-काश्मीर आणि लडाखला भारतीय नकाशातून वगळले

एमपीसी न्यूज : जागतिक आरोग्य संघटनेने त्यांच्या सदस्य देशांचा एक नकाशा प्रकाशित केला आहे. या नकाशात प्रत्येक देशात एकूण किती रुग्ण आढळले आहेत आणि किती मृत्यु झाले आहेत, हे दर्शवण्यात आले आहे. यांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने भारताच्या नकाशांतून जम्मू-काश्मीर आणि लडाखला वगळले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावर ‘कोविड 19 डॅशबोर्ड’च्या अंतर्गत हा नकाशा प्रकाशित केला गेला आहे. यांत भारतीय भूभाग हा गडद निळ्या रंगाने दर्शवला गेला असून, जम्मू-काश्मीर आणि लडाख मात्र करड्या रंगात वेगळे दाखवले आहे.

या नकाशावरील डाटा हा शेवटचा दहा जानेवारीस अपडेट केला गेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.