BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala – जागतिक पत्रकार दिनानिमित्त जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन

INA_BLW_TITLE
एमपीसी न्यूज – जागतिक पत्रकार दिनाच्या निमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन लोणावळा शहर पत्रकार संघाच्या कार्यालयात करण्यात आले.
मराठी पत्रकारितेची मुर्हतमेढ लावणारे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन व त्यांनी सुरु केलेले मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे 6 जानेवारीला सुरु केल्याने देशभरात सर्वत्र हा दिवस मराठी पत्रकारदिन म्हणून साजरा केला जातो.
पत्रकार कक्षात संघाचे अध्यक्ष बंडू येवले, माजी अध्यक्ष व नगरसेवक निखिल कविश्वर, उपाध्यक्ष संजय पाटील, सुनिल चव्हाण, प्रशांत पुराणीक, दीपक तारे, विशाल विकारी, प्रदिप वाडेकर, संजय हुलावळे, नरेश बोरकर, संतोष सरदेशमुख, गोपीनाथ मानकर, संतोषी तोंडे, वैशाली दळवी, चित्रा कामत, नगरपरिषदेचे ग्रंथपाल विजय शेवाळे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. यानंतर लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी सर्व पत्रकारांना सन्मानित करत पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
HB_POST_END_FTR-A4

.