Wakad News : रिलेशन ठेवण्यास नकार दिल्याने तरुणीला आणि तिच्या आईला घरात घुसून मारहाण

  मैत्रिणीलाही जीवे मारण्याची धमकी

0

एमपीसी न्यूज – तरुणीने रिलेशन ठेवण्यास नकार दिल्याने तरुणाने तरुणीच्या बेडरूमचा दरवाजा तोडून तरुणीला आणि तिच्या आईला लथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तिथे असलेल्या तरुणीच्या मैत्रिणीला एका बुक्कीत ठार मारेन अशी धमकी दिली. हा प्रकार सोमवारी (दि. 3) रात्री वाकड येथे घडला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

अभिजित मधुकर शिंगण (वय 28, रा. पिंपळे निलख, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 29 वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्या तोंडओळखीचा आहे. फिर्यादी यांनी त्याच्या सोबत रिलेशन ठेवावे यासाठी तो सतत फिर्यादीवर पाळत ठेऊन त्यांचा पाठलाग करत होता. फिर्यादी यांनी रिलेशन ठेवण्यासाठी आरोपीला नकार दिला.

त्यावरून आरोपी फिर्यादी यांच्या घरी आला. बेडरूमचा दरवाजा तोडून आत येऊन त्याने फिर्यादीचा विनयभंग केला. ‘तुला खूप माज आला आहे का. तुला माझ्या सोबत राहायचे नाही का. थांब तुला आता बघतो’ अशी धमकी देऊन त्याने फिर्यादी आणि त्यांच्या आईला लथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिथेच असलेल्या फिर्यादी यांच्या मैत्रिणीला ‘तू जर मध्ये आलीस तर तुला एका बुक्कीत ठार मारीन’ अशी धमकी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment