Charholi: ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहणा-या तरुणाने तरूणीच्या डोक्यात पक्कड मारली

एमपीसी न्यूज – पाच वर्षापासून ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहणार्‍या तरूणाने घरगुती वादातून तरूणीच्या डोक्यात पक्कड मारली. यात तरूणी जखमी झाली. ही घटना डुडूळगाव येथे घडली.

याप्रकरणी संतोष भारत तायडे (वय 28, रा. कारेगाव, रांजणगाव, ता. शिरूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 28 वर्षीय तरूणीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष आणि फिर्यादी तरूणी गेल्या पाच वर्षापासून डुडुळगाव – चिंचोचीवाडी येथे ’लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहत आहेत. 15 ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजता दोघांमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला. या वादात संतोषने रागाच्या भरात घरातील पक्कड तरूणीच्या डोक्यात मारली. यात तरूणी जखमी झाली. सहायक फौजदार सावंत तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.