Sangvi: दारूसाठी पैसे न दिल्याने तरूणाला लुटले

एमपीसी न्यूज – मेडिकलमध्ये जाणार्‍या तरूणाला तिघांनी रस्त्यात आडवून दारू पिण्यासाठी पैसे मागितले. तरूणाने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच्या खिशातील साडेसतराशे रूपये जबरस्तीने काढून घेतले.

तसेच रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दोन मोटारींच्या काचा फोडल्या. ही घटना पिंपळेगुरव येथे गुरूवारी रात्री साडेनऊ वाजता घडली.

याप्रकरणी सागर सुनिल अग्रवाल (वय-23, रा. पिंपळे गुरव) याने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुनित कुंभार, विवेक चौरसिया, छोट्या (रा. कदम बिल्डींग, शिवनेरी कॉलनी, पिंपळे गुरव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर हा गुरूवारी रात्री मेडिकलमध्ये पायी जात होता. त्यावेळी आरोपींनी त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्याच्या खिशातील साडेसतराशे रूपये जबरदस्तीने काढून घेतले.

तसेच रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दोन मोटारीच्या काचा फोडून 20 हजार रूपयांचे नुकसान केले.  सांगवी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.