Nigdi : तरूणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – पायी चालत जाणार्‍या तरूणाला सहा जणांच्या टोळक्याने डोक्यावर, हातावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना गुरूवारी (दि. 12) रात्री साडेआठच्या सुमारास ओटास्किम येथे घडली.

शांताराम रामचंद्र कांबळे (वय-32, रा. ओटास्किम, निगडी) असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दाद्या गवळी, बबलू सुरेश रणदिवे, शंकर भालेराव, छोट्या मगर, सचिन जाधव, डॅन्या (सर्व. रा. ओटास्किम, निगडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताराम कांबळे गुरूवारी रात्री ओटास्किम येथील भिमाई चौकातून पायी जात होते. तेथे आलेल्या आरोपींनी त्यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करत दगडाने हाताला, पाठीवर मारून गंभीर जखमी केले. निगडी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.