Pimpri : भर चौकात तरुणाने घेतला गळफास

एमपीसी न्यूज – भर चौकात जाहिरतीच्या होर्डिंगला गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. १०) सकाळी सातच्या सुमारास कोकणे चौक, राहाटणी येथे उघडकीस आली.

नितीन उद्धव मंडलिक (वय २७, रा. नखातेवस्ती, रहाटणी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत नितीन हा मूळचा बीड जिल्ह्यातील आहे. मागील दहा वर्षांपासून तो रहाटणी येथे राहत होता. एक वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. नितीन उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवत होता. बुधवारी रात्री त्याने दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.