Pune News : भावजयीकडे एकटक पाहत असल्याचा जाब विचारल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज : भावजयीकडे एकटक पहात असल्याचा जाब विचारल्यामुळे 19 वर्षीय तरूणीवर चार जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करत जीवघेणा हल्ला केला मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रासगे आळी येथे रविवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अभिजीत गायकवाड (वय 22), पन्ना जाधव (वय 20), आकाश वाघमारे (वय 20) आणि रुपेश भोसले (वय 19) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सौरभ राजू शिंदे (वय 19) यांनी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास, फिर्यादीची भावजयी धुणे धूत असताना आरोपी अभिजीत गायकवाड हा घरा समोर उभा राहून तिच्याकडे एकटक पाहत होता. फिर्यादीने याचा जाब विचारल्याने अभिजित गायकवाड याने इतर आरोपींशी संगणमत करून फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी शॉट डोक्यात कोयत्याने वार करून त्याला जखमी केले आहे.  मुंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.