Hadapsar News: खुन्नसने पाहिले म्हणून केले कोयत्याने वार

0

एमपीसी न्यूज: पुण्याच्या हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शुक्रवारी मध्यरात्री एक खूणाची घटना उघडकीस आली. खुन्नसने पाहण्यावरून झालेल्या वादातून चार ते पाच जणांच्या टोळक्याने कोयत्याने सपासप वार करून एका तरुणाचा निर्घुणपणे खून केला. अनिकेत घायतडक (वय 28) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हडपसर पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काही आरोपींची नावे निष्पन्न झाले असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

प्राथमिक माहितीनुसार, मयत अनिकेत घायतडक आणि आरोपींमध्ये एकमेकांकडे खुन्नसने पाहण्यावरून वाद झाला. या वादातूनच चार ते पाच जणांच्या टोळक्याने अनिकेत घायतडक याला मांजरी तील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात गाठले. त्यानंतर कोयत्याने सपासप वार करून निर्घुणपणे त्याचा खून केला आणि आरोपी पसार झाले.

दरम्यान पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर हडपसर पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ससून रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला असून या खून प्रकरणातील एका संशयिताला पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. मयत अनिकेत घायतडक याच्यावर मुंढवा पोलीस स्टेशन मध्ये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III