Pune News : पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून तरुणावर चाकूने वार, इराणी टोळीचा प्रताप

एमपीसी न्यूज : पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून शिवाजीनगर परिसरातील इराणी टोळीच्या तीन सदस्यांनी एका 20 वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला केला. त्याच्या गळ्यावर चाकूने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. पाटील इस्टेट परिसरातील महात्मा गांधी वसाहतीत मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. खडकी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कझम उर्फ कझमफर हुमायून इराणी, सय्यद नूर जानशा इराणी आणि रुकसाना सय्यदनूर इराणी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी हैदर शौकत शेख या तरुणाने खडकी पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री फिर्यादी हे आजीच्या दुकानात जात असताना आरोपी त्या ठिकाणी आले. आमच्या नातेवाईकांची खबर पोलिसांना देतो असा गैरसमज त्यांचा झाला आणि दोन आरोपींनी फिर्यादीला हातांनी पकडले तर तिसरी आरोपीने त्याच्या गळ्यावर चाकूने वार केले. याशिवाय त्याच्या डोक्यात आणि हातावर देखील चाकूने वार केले. त्यानंतर परिसरात राहणाऱ्या लोकांच्या अंगावर चाकु उगारून दहशत निर्माण केली. खडकी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.