Pune News : किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार

0

एमपीसी न्यूज : किरकोळ कारणावरून एका 17 वर्षीय तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले. सुदैवाने या घटनेत या तरुणाला गंभीर दुखापत झाली नाही. चतु:शृंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील जनवाडी येथे हा प्रकार घडला. 17 वर्षीय तरुणाने दिलेल्या तक्रारीनंतर चतुशृंगी पोलीस ठाण्यात अजय बेल्लम (वय 25, रा. सोमेश्वर मंदिरा जवळ जय भवानी मित्र मंडळ, जनवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहे. बुधवारी रात्रीच्या वेळेस फिर्यादी हे घराच्या बाहेर उभे असताना आरोपी अजय त्या ठिकाणी आला आणी ” तू राकेश शेजवळ याच्या बहिणीस काल शिवीगाळ का केली” असे विचारत त्याच्या हातातील कोयत्याने फिर्यादीच्या डाव्या कानाच्या वर व उजव्या हाताच्या अंगठ्याला मारून जखमी केले.

यावेळी फिर्यादीची बहिण त्याला वाचवण्यासाठी आली असता त्याने तिलाही शिवीगाळ केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment