Dighi Crime News : वीस रुपयांचे दूध मागण्यासाठी आलेला तरुण वीस हजारांचा मोबाईल घेऊन पळाला

एमपीसी न्यूज – वीस रुपयांचे दूध मागण्यासाठी आलेल्या तरुणाने घरातील वीस हजारांचा मोबाईल फोन चोरून नेला. ही घटना 16 एप्रिल रोजी दुपारी आदर्शनगर, दिघी येथे घडली.

अमोल संभाजी लगड (वय 26, रा. आदर्शनगर, दिघी) यांनी याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दूध विक्री करतात. 16 एप्रिल रोजी दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती फिर्यादी यांच्या घरी आला. त्याने वीस रुपयांचे दूध मागितले. त्याला दूध देण्यासाठी फिर्यादी किचनमध्ये गेले असता ग्राहकाने घरातील वीस हजार रुपये किमतीचा वन प्लस मोबाईल फोन चोरून नेला.

दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.