Wakad : नातेवाईक महिलेला भेटणा-या तरुणाचे पाडले दात; दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – नातेवाईक महिलेला का भेटतो, असे म्हणत दोन जणांनी एका तरुणास दगडाने मारहाण करत त्याचा दात पाडला. ही घटना काळाखडक, वाकड येथे मंगळवारी (दि. 10) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.

अमोल रामचंद्र पवार (रा. चिंचवड) व अनोळखी व्यक्‍ती (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी गणेश सूर्यभान चाटे (वय 32, रा. चऱ्होली) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सव्वाअकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी हे काळाखडक येथे थांबले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी पवार याने “तू माझ्या नातेवाईक महिलेला का भेटतो? तिच्या नावे जमीन कर, अशी विचारणा करीत चाटे यांना दगडाने मारहाण करीत दात पाडला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.