Pune Crime News : बीएमडब्ल्यू चालकाची अरेरावी, गाडी हळू चालवा सांगणार्‍या तरुणीला भररस्त्यात मारहाण 

एमपीसी न्यूज : दुचाकीवरुन जात असताना बीएमडब्ल्यू कार चालकाचा धक्का लागल्याने गाडी हळू चालवा असेच सांगणाऱ्या तरुणीला बीएमडब्ल्यू चालकाने लाकडी दांडक्याने भररस्त्यात मारहाण केली. वानवडीतील ब्रँड फॅक्टरी च्या समोर शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. 

याप्रकरणी वैष्णवी गणेश ठुबे (वय 23) या तरुणीने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एम एच 12 एम क्यू 56 या बीएमडब्ल्यू कारमधील एक महिला आणि चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी तरुणी दुचाकीने वहिनीसोबत जात असताना बीएमडब्ल्यू कार चालकाने त्याची कार वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून, बेदरकारपणे चालवून फिर्यादीच्या गाडीला पाठीमागून ओव्हरटेक करताना फिर्यादीच्या वहिनीच्या पायाला गाडीचा धक्का लागला. यामुळे फिर्यादीने कार चालकाला गाडी हळू चालवा असे सांगितले.

याचाच राग आल्याने बीएमडब्ल्यूमधील कार चालकाने फिर्यादीना वाईट शिवीगाळ केली आणि नंतर फातिमानगर चौकात गाडी थांबून गाडी मधील लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या खांद्यावर आणि पाठीवर मारहाण केली. यामध्ये फिर्यादीच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. वानवडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.