Sangvi News : घरासमोर लघुशंकेस मनाई केल्याने तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – घरासमोर लघुशंका करण्यास मनाई केल्याने तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना पिंपळे गुरव येथे बुधवारी (दि. 5) सायंकाळी घडली.

_MPC_DIR_MPU_II

मयुर बनसोडे आणि त्याचे दोन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मोनू केनाराम बैद (वय 23, रा. भाऊनगर, विश्‍वकर्मा मंदीर लेन, पिंपळे गुरव) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी गुरुवारी (दि. 6) याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास आरोपी मयुर बनसोडे हा फिर्यादी मोनू यांच्या घरासमोर लघुशंका करीत होता. त्यास फिर्यादी मोनू, यांच्या घराशेजारी राहणारी महिला कल्पना भोईर आणि रवी बैद यांनी आरोपी मयुर याला हटकले.

त्यावेळी आरोपी मयुर याने शिवीगाळ करीत तुला बघतोच, अशी धमकी देत मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी फिर्यादी मोनू हे भांडण साडेविण्यसाठी गेले असता आरोपी मयुर याने त्याच्या कमरेला लावलेला कोयता काढून मोनू याच्यावर सपासप वार करून गंभीर जखमी केले. तर इतर दोन आरोपींनी लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक गवारी याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.