Bhosari: पोलिसात तकार दिल्याच्या कारणावरून तरुणावर कोयत्याने वार

The youth was stabbed after he lodged a complaint in police in kasarwadi bhosari

एमपीसी न्यूज- पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून एका तरुणावर चार जणांनी कोयत्याने वार केले. ही घटना शुक्रवारी (दि.29) दुपारी कासारवाडी रेल्वे स्टेशनजवळ घडली.

अश्‍पाक खलील शेख (वय 20, रा. हिराबाई झोपडपट्टी, कासारवाडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गौसपाक खलील शेख (वय 30) यांनी रविवारी (दि. 31) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी क्रिष्णा जमादार, सायबु काळे, शिवराज बाणी, निशांत कदम (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास फिर्यादी गौसपाक आणि त्यांचा भाऊ अश्‍पाक हे दोघे आपल्या घराजवळ उभे होते.

त्यावेळी आरोपी हातात कोयता घेऊन आले. ‘तू काल माझ्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार का दिली’, अशी विचारणा करीत आरोपी अंगावर धावून आले.

यामुळे घाबलेला अश्‍पाक हा कासारवाडी जवळील रेल्वे रुळाच्या दिशेने पळून गेला. आरोपींनी त्याचा पाठलाग करीत गाठले.

जमादार आणि काळे या दोघांनी कोयत्याने वार केले. इतर दोन आरोपींनी लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like