Chakan : बसची प्रतीक्षा करणा-या तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – बसची वाट पाहत उभा असलेल्या तरुणाचा मोबाईल फोन दुचाकीस्वारांनी हिसकावला. मोबाईल हिसकावल्यानंतर दुचाकीस्वार वेगात निघून गेले. ही घटना चाकण येथे पुणे नाशिक रोडवर स्वयंवर मंगल कार्यालयासमोर मंगळवारी (दि. 11) सायंकाळी चारच्या सुमारास घडली.

विकास प्रकाश पाटील (वय 23, रा. विनायक पार्क, चाकण. मूळ रा. सिंदखेडा, जि. धुळे) या तरुणाने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विनायक लक्ष्मण थिगळे (रा. वरची भांबुरवाडी, खेड, जि. पुणे) आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास मूळ धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा मधील आहे. तो शिक्षणासाठी पुण्याला आला आहे. मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास चाकण मधील स्वयंवर मंगल कार्यालयासमोर तो बसची वाट पाहत उभा होता. त्यावेळी पल्सर मोटारसायकल (एम एच 14 / ई आर 7084) वरून तीनजण आले. भरधाव वेगात आलेल्या दुचाकीस्वारांनी विकासच्या हातातील मोबाईल फोन हिसकावला. ही घटना त्याने त्याच्या नातेवाईकाला सांगितली. दोघे मिळून चाकण पोलीस ठाण्यात आले असता, मोबाईल फोन हिसकावणा-यांमधील एकाला (विनायक) नागरिकांनी पकडून पोलीस ठाण्यात आणले होते. विकासने चोराला ओळखले असून त्याचे अन्य दोन साथीदार पळून गेले आहेत. यावरून गुन्हा दाखल करण्यात आलं असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.