Pimpri : असे आहेत आर्थिक वर्षात तरतूद उपलब्ध करुन देण्यात येणारे महापालिकेचे महत्त्वाचे उपक्रम….

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2020-21 या आर्थिक वर्षांचा मूळ 5232 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 6 हजार 628 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (सोमवारी) स्थायी समितीला सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये येत्या आर्थिक वर्षात तरतूद उपलब्ध करुन देण्यात येणारे महापालिकेचे महत्त्वाचे उपक्रम कोणते आहेत ते जाणून घ्या.

प्रभाग क्र. 2 बो-हाडेवाडी विनायकनगर, मोशी येथे छत्रपती संभाजी महाराज, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे पुतळा शिल्प उभारणे.

वेंगसरकर अॅकॅडमी येथे पॅव्हेलीयनचे काम करणे, थेरगांव येथे खेळाचे मैदान विकसित करणे

पिंपळे सौदागर आरक्षण क्रमांक 362 येथे खेळाचे मैदान विकसित करणे तसेच पिंपळे सौदागर आरक्षण क्रमांक 367 अ येथे खेळाचे मैदान विकसित करणे.या कामांसाठी एकूण तरतूद रु. 11 कोटी 85 लाख.

प्रभाग क्रमांक 10 पिंपरी येथील स्व्हे नं. 31/1-1 येथे नि:समर्थ दिव्यांगांसाठी कल्याणकारी केंद्र बांधणे,  आकुर्डी येथे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय बांधणे

थेरगांव सर्व्हे नं.9 येथे बहुउद्देशीय इमारत बांधणे तसेच जिजामाता हॉस्पिटल पिंपरी येथे नवीन इमारत बांधणे या कामांसाठी एकूण तरतूद रु. 17 कोटी 95 लाख

वाकड भुजबळ वस्तीमध्ये डीपी रस्ता विकसित करणे रु. 4 कोटी

ताथवडे येथील शनी मंदिराकडून मारुंजीगावाकडे जाणारा डीपी रस्ता विकसित करणे. रु. 5 कोटी

ताथवडे गावठाणापासून पुनावळेकडे जाणारा डीपी रस्ता विकसित करणे रु. 4 कोटी 50 लाख.

ताथवडे येथील जीवननगरकडून मुंबई बेंगलोर हायवेकडे जाणारा डीपी रस्ता विकसित करणे. रु. 4 कोटी 50 लाख.

खंडोबा माळ चौक म्हाळसाकांत चौकापर्यंत पालखी मार्गाचे काँक्रीटीकरण करणे. रु. 6 कोटी 23 लाख.

वाकड गावठाण येथील रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण करणे. रु. 4कोटी 50  लाख.

वाकड काळा खडक ते वाकड पोलीस स्टेशन येथील डीपी रस्ता विकसित करणे. रु. 3 कोटी.

प्रभाग क्र. 25 मध्ये रस्ते काँक्रीटीकरण करणे. रु. 5 कोटी

प्रभाग क्र.26 मध्ये छत्रपती चौक ते उत्कर्ष चौकापर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता करणे. रु. 5 कोटी.

वाकड येथील कावेरी चौक सब-वे ते पिंक सिटी कॉर्नर पर्यंत डीपी रस्ता सिमेंट काँक्रीटचा करणे. रु. 9 कोटी 46 लाख

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.