Hinjawadi crime : गोडाऊन मधील सामानाची तोडफोड करत सव्वादोन लाखांची चोरी

एमपीसी न्यूज – गोडाऊनचे कुलूप तोडून गोडाऊन मधील सामानाची तोडफोड केली. त्यांनतर दोन लाख 30 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. (Hinjawadi crime) ही घटना शनिवारी (दि. 3) पहाटे सिद्धार्थनगर बावधन येथे घडली.

संतोष नवनाथ सुरवसे (वय 32, रा. नऱ्हे, पुणे) यांनी याप्रकरणी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Crime News : महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतून 49 बॅटऱ्यांची चोरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे सिद्धार्थनगर बावधन येथे गोडाऊन आहे. शनिवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास दोन अनोळखी चोरट्यांनी गोडाऊनचे (Hinjawadi crime) कुलूप तोडून आत प्रवेश केला. गोडाऊन मधील गल्ल्यातून 2 लाख 30 हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.